Ad will apear here
Next
पुण्यात ३० सप्टेंबरला दातार कुलसंमेलनाचे उद्घाटन
डॉ. धनंजय दातारपुणे : दातार घराण्याच्या पुढील पिढ्यांना माहिती मिळून ते एकत्र यावेत, दातार कुलवृत्तांत अद्ययावत व्हावा व दातार आडनाव भूषविणाऱ्या कर्तबगार व्यक्तींचा सन्मान व्हावा, या तिहेरी हेतूने ‘अखिल दातार कुलसंमेलन २०१८’ आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन जागतिक कीर्तीचे उद्योगपती आणि दुबईस्थित ‘अल अदील’ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार यांच्या हस्ते होणार आहे.

हा मेळावा ३० सप्टेंबरला पुण्यातील कर्वेनगरमधील प्रतिज्ञा हॉलमध्ये येथे सकाळी १०.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध निवेदिका व कुलसंमेलनाच्या सूत्रसंचालक मीनल दातार या डॉ. दातार यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. जीवनाच्या संघर्षपूर्ण प्रवासातून अनेक अडथळे पार करत व्यवसायात गरूडभरारी घेणारे आणि मराठी उद्योजकतेचा झेंडा जागतिक पातळीवर फडकावणारे डॉ. दातार या मुलाखतीतून नवउद्योजकांना मार्गदर्शन करतील.

‘अखिल दातार कुलसंमेलन २०१८’ हा उपक्रम म्हणजे दातार हे कुलनाम असणाऱ्यांचे, तसेच मूळचे दातार परंतु कालौघात आघरकर, आगरकर, फडणीस, वर्तक, सबनीस, कुलकर्णी, दफ्तरवार व चौकर ही उपनामे लावणाऱ्यांचे स्नेहसंमेलन आहे.

या स्नेहसंमेलनाच्या आयोजनाची संकल्पना स्पष्ट करताना या कुलसंमेलनाचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी म्हणाले, ‘दातार कुलनाम असणाऱ्या व्यक्तींची माहिती असलेला दातार कुलवृत्तांत सन १९७४मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर गेली ४४ वर्षे तो अद्ययावत झाला नाही आणि दातार कुलनामाचा मेळावाही व्यापक पातळीवर झाला नाही. दातार घराण्याच्या पुढील पिढ्यांना ही माहिती मिळून ते एकत्र यावेत, दातार कुलवृत्तांत अद्ययावत व्हावा व दातार आडनाव भूषविणाऱ्या कर्तबगार व्यक्तींचा सन्मान व्हावा, या तिहेरी हेतूने आम्ही हा उपक्रम आखला असून, त्याची सुरुवात पुण्यापासून होत आहे.’

‘महाराष्ट्रभर, तसेच इतर राज्यांत स्थाईक झालेले दातार या मेळाव्यासाठी येणार असून, सुमारे ४०० लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. मेळाव्यात ज्येष्ठ व्हायोलिन वादक पद्मश्री डी. के. दातार, मसालाकिंग डॉ. धनंजय दातार, जागतिक कीर्तीचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखील दातार, शस्रास्र रचना तज्ज्ञ तसेच आर्मामेंट्स विभागाचे माजी सरसंचालक अनिल दातार, महाराष्ट्र भूषण अरुण दातार, गीता धर्म प्रसारक डॉ. मुकुंद दातार, गायिका प्रमिला दातार आदी दहा नामवंत दातार व्यक्तींचा सत्कार केला जाईल. दातार कुलनाम भूषवणाऱ्या व्यक्तींची माहिती देणाऱ्या संकेतस्थळाचे उद्घाटनही या वेळी होईल,’ अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.

‘या प्रतिष्ठित मेळाव्यात सहभागी होण्याची संधी मिळणे, हे माझ्यासाठी आनंददायक असून, दातार कुलनामाच्या अनेक ख्यातनाम व्यक्तींपैकी एक असणे गौरवास्पद आहे,’ अशी प्रतिक्रिया डॉ. दातार यांनी व्यक्त केली आहे.

उद्घाटनाविषयी :  
दिवस :
रविवार, ३० सप्टेंबर २०१८
वेळ : सकाळी १०.३० वाजता
स्थळ : प्रतिज्ञा हॉल, कर्वेनगर, पुणे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZJVBS
 I am thrilled to attend this historic gathering of all Datars ! All The Best !!
 It very nice achievement for all DATAR family members
 Please make this Kulvrutant available to me.
Similar Posts
‘कष्ट व प्रामाणिकपणाने तरुणाईने समृद्धी साधावी’ पुणे : ‘व्यवसाय कोणताही निवडलात, तरी त्याच्याशी तन्मय व्हा. दुसऱ्याचा व्यवसाय मोठा आणि आपला मात्र छोटा, असा न्यूनगंड मनाशी बाळगू नका. कारण आपण एखाद्या व्यवसायाचे मालक असणे हीच फार महत्त्वाची गोष्ट असते. कष्ट आणि प्रामाणिकपणाने कार्यरत राहिल्यास प्रत्येक व्यवसाय नक्कीच वाढतो, हे सत्य लक्षात ठेऊन आजच्या
डॉ. दातार ‘यूएई’तील श्रीमंत भारतीयांच्या यादीत १८वे पुणे : ‘अल अदील ट्रेडिंग’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार यांना ‘अरेबियन बिझनेस’तर्फे संयुक्त अरब अमिरातीतील (यूएई) सर्वांत श्रीमंत भारतीयांच्या यादीत २०१८ वर्षासाठी १८ वे मानांकन देऊन गौरवण्यात आले आहे. या यादीत समावेश असलेले डॉ. दातार हे एकमेव महाराष्ट्रीय उद्योजक आहेत.
चिकाटी, सातत्य हीच यशस्वी उद्योगाची गुरुकिल्ली पुणे : ‘व्यवसायात चढ-उतार येतात. अशा स्थितीतही आत्मविश्वासाने उभे राहिले पाहिजे. चिकाटी, सातत्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा आणि समयसूचकता हीच यशस्वी उद्योगाची गुरुकिल्ली आहे. हे गुण आत्मसात करून, नोकरीपेक्षा व्यवसाय करण्याला अधिक प्राधान्य द्यावे,’ असा सल्ला उद्योजक मुकुंद कुलकर्णी आणि अच्युत लिमये यांनी नवउद्योजकांना दिला
साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम पुणे : पुण्यामध्ये येत्या रविवारी २८ जानेवारी रोजी ‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. साहसी अध्यात्मिक यात्रा परिक्रमा आणि त्यातून निर्माण झालेले साहित्य, त्यांची विक्रमी विक्री यातून सुरू झालेले विविध सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, लोकजीवन आणि ग्रामीण शहरी जीवनशैलीचा समन्वय

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language